कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यात बिबट्या नाहीच; वन विभाग
बार्शी : बार्शी तालुक्यात बिबट्या आल्याच्या अफवेवर पडदा टाकत बार्शी तालुक्याच्या हद्दीत बिबट्याचा वावर नसल्याचा निर्वाळा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी एच. बी, कोकाटे यांनी दिला.
गेले काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे तीन बळींबरोबरच पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. करमाळा तालुक्यातील बिबट्या हाती येत नाही असे असतानाच अचानक बिबट्या बार्शी तालुक्यात आल्याच्या अफवा सौशल मीडिया वरून पसरविण्यात आल्या. ७ डिसेंबर रोजी व्हळे शेलगाव या गावात हिंस प्राणी दिसल्याची माहिती पोलीस पाटील योगेश व्हळे यांनी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे व तालुका पोलीस स्टेशनला दिली.
त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या काही सहकार्यांसह व्हळे शैलगाव या गावात जाऊन विविध ठिकाणी पाहणी केली व ठसे तपासले.त्यानुसार ते ठसे बिबट्याचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्राणी बिबट्या नसून तरस असण्याची शक्यता असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन कोकाटे यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच चतुराबाई व्हळे,उपसरपंच शिवाजी पाटील,ग्रामस्थ हरिभाऊ शिंदे, गोविंद व्हळे आदी उपस्थित होते.