कुतूहल न्यूज नेटवर्क
पिंपरी (आर) येथील मुस्लिम दफनभूमीकडे जाणाऱ्या ओढ्यावर पुल उभारण्यात यावा, प्रा.पाटील यांची मागणी
बार्शी प्रतिनिधी :पिंपरी (आर) ता.बार्शी येथील मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुल बांधणे अत्यावश्यक असताना जिल्हा परिषद प्रशासान नाहक दुर्लक्ष करत आहे . पावसामुळे दर वर्षी ओढ्यात पाच ते सहा फूट पाणी असते . ओढ्यात पाणी असल्यामुळे दफनभूमीकडे जाणे जिकिरीचे होऊन बसते. प्रशासन विभागाने वारंवार तक्रारी करून सुधा दखल घेतली नाही. भविष्यात जो काही धोका निर्माण होईल त्यास प्रशासन जबाबदार राहील. पिंपरी मुस्लिम बांधवांना आपल्या हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. पुल न उभारल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रा. शरद पाटील दिला आहे. संबधित प्रती पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री कार्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.