पांगरी -पांगरी ता बार्शी येथे म्होरक्या चित्रपटातील कलाकारांची भेट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘मोहरक्या ‘ चित्रपट येत्या 24 जानेवारीला जगभरात प्रदर्शित होणार.
पांगरी येथे म्होरक्या चित्रपटातील कलाकारांची भेट
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वात्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘ मोहरक्या ‘ हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला भारतासह जगभरातून प्रदर्शित होणार आहे. बार्शीकर अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. मोहरक्या ही फक्त परेड शिकवणाऱ्या मुलाची गोष्ट नाही तर खरे म्हणजे ही जगाच्या इतिहासातील याबरोबरच आपल्या भोवतालच्या प्रत्येकाची गोष्ट आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाची प्रसिद्धी सुरु आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटात तयार करण्यात आलेले प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील ‘मोहरक्या ‘ हें गाणे सध्या चांगलेच गाजले आहे. यात पहिल्यांदाच आनंद शिंदे यांनी रॅप गायले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्तिथीत बार्शीसारख्या छोटया शहरातील आजूबाजूच्या छोटया गावामध्ये चित्रपट चित्रित झाला आहे. गणतंत्र दिनाला शाळेत होणाऱ्या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी संघर्ष करणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलाची हीं कथा ‘ मोहरक्या ‘ मध्ये सांगितली आहे. या कथेतून लोकशाहीतली नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे