दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट शहरातील श्रीमंत कमलाराजे चौकाची बिकट अवस्था; नगरपरिषदेचे दुर्लक्ष
अक्कलकोट : शहरातील मुख्य आकर्षक असलेल्या श्रीमंत कमलाराजे चौकाची अतिशय दुरवस्था झाली आहे. चौक परिसरात असलेल्या लोंखडी कठड्याचा वापर कपडे सुखवण्यासाठी होत असलेले निदर्शनास येत आहे.आधी सदरील चौक अतिशय सुंदर सुशोभित दिसत होतं. पण सध्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

चौकतील कांरजेही बंद आहेत.प्रत्येक शहरात असलेल्या चौकाला महत्त्व तर असतेच तसेच सुशोभित व सुंदर शहराची ओळख बनलेले असते मात्र सध्या अक्कलकोट शहरातील चौकाची स्थिती चांगली नाही.याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. त्वरित चौकाची दुरूस्ती करून शहराची शोभा वाढवावी अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.