दयानंद गौडगांव: कुतूहल न्यूज नेटवर्क
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
चिंचवड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खराळवाडी येथे एका कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज रात्री नऊ च्या सुमारास घडली. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या डिवाइडरवर आदळली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनर आणि मेट्रो प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस हवालदार दाखल झाले असून अधिक चौकशी करीत आहेत.