fbpx

बार्शी तालुक्यातील खांडवी जिल्हा परिषद मुलींची शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावाजलेली आहे.

बार्शी- बार्शी तालुक्यातील खांडवी जिल्हा परिषद मुलींची शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावाजलेली आहे.विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्सासाठी इथला शिक्षक वर्ग अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात येते म्हणून या शाळेची ओळख बार्शी तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून केली जाते. या शाळेत येणारें विद्यार्थी हें सर्वसामान्य कुटुंबातुन येत असतात यामुळे या विद्यार्थ्यांना विविध अनुभव मिळावेत यासाठी सर्व शिक्षक सतत प्रयत्न करत असतात.या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे शिक्षणासाठी सतत अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यामुळे ही शाळा शैक्षणिक दर्जासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रगण्य मानली जात आहे.

येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांचे सामान्य ज्ञान, आवडी निवडी व छंद जोपासले जातात. 
नुकतेच पार पडलेल्या जिल्हा परिषद सोलापूर आयोजित पंचायत समिती बार्शीच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय टँलेंट हंट नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात कु.अंकिता साळुंके हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे याचबरोबर तालुकास्तरीय टॅलेंट हण्ट गुणवत्ता शोध चाचणी प्रश्नमंजूषा स्पर्धेत कु. सिद्धी संदीप निकम इयत्ता सहावी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.वरील विद्यार्थिनींची मुख्याध्यापिका श्रीमती मुजावर मॅडम,अभिमन्यू मिरगणे सर, सुधाकर मिरगणे सर,लक्ष्मण ताकभाते सर, नागनाथ सातपुते सर, संकपाळ मॅडम, गावडे मॅडम, पाटील मॅडम,केंद्रप्रमुख श्री.तिकटेसाहेब, बार्शी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, शा.व्य.स.अध्यक्ष, रमेश बारंगुळे, सरपंच सखुबाई सुतार ,ग्रामपंचायत सदस्य.रामेश्वर भाकरे ,उपसरपंच अमोल पाटील व सर्व सदस्यांनी या यशाबदद्ल दोन्ही विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीयस्पर्धेसाठी शुभेच्छा हीं दिल्या.

अशाप्रकारे ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, व गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासोबतच त्यांच्या प्रगतीकडे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे… आमच्या कुतूहल समूहाकडून शाळेसाठी भरभरून शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *