आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी गावची ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यात आता गावातील अमोल वसंत जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी या मागणीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून गावातील मोबाईल टॉवर वरती चढून आंदोलन केले.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोबाईल टॉवर वरती चढून शोले स्टाईल आंदोलन
कारी गावाची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 5219, मतदान 4151, व प्रभाग 5 तर 13 सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत आहे. या टॉवर परिसरात गावातील युवक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.सध्या घटनास्थळी पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल ,गावच्या पोलीस पाटील अमृता माळी दाखल झाले आहेत,अमोल जाधव मोबाईल टॉवर वरुन खाली उतरले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.