कुतूहल न्यूज नेटवर्क
आमच्या गल्लीत का आलास म्हणून कोरेगाव येथे अल्पवयीन मुलाचा हात मोडेपर्यंत मारहाण
बार्शी : तू आमच्या गल्लीत का आलास असे म्हणुन एका अल्पवयीन मुलाचा हात मोडेपर्यंत मारहाण करत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे घडला आहे.
उमेश चोरमले (वय ४७, रा. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.ओमराजे (वय १५, रा.कोरेगाव ) असे जखमी मुलाचे नाव आहे. फिर्यादी त्याचा मित्र रोहन रामगुडे याच्या भावाच्या लग्नाला सायकल वरुन गेलो होता. लग्न लावून घरा कडे निघाला असता रामगुडे याच्या घरा समोर आला असता. उमेश चोरमले याने फिर्यादीला तर तू वाण्याचा आहेस, आमच्या गल्लीत का फिरतो, असे म्हणून शिवीगाळ सुरु करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी खाली पडला. तरीही त्याने डावे हातावर लाथा घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी जखमी अवस्थेत हा मोठ मोठ्याने ओरडत मला कशामुळे मारता असे विचारत होतो.त्या मारहाणीत फिर्यादीचा हात मोडला असून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजेंद्र मंगरूळे हे करत आहेत.