कुतूहल न्यूज नेटवर्क
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा झाडबुके महाविद्यालयाच्या वतीने सत्कार
बार्शी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या वतीने पुणे शिक्षक विभाग मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री. यु बी बेणे यांनी केला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली प्रस्ताविक सचिन झाडबुके यांनी केले. सत्काराला उत्तर देताना नूतन आमदार आसगावकर म्हणाले की, जुनी पेन्शन मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार, वरिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावू विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे बाबत पाठपुरावा करू झाडबुके परिवाराने केलेला सत्कार मी कायम स्मरणात ठेवीन.
अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे म्हणाल्या की, नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे शिक्षक, संस्थाचालक व आमदार असल्याने त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्नांची जाणीव असल्याने ते विविध प्रश्नांची यथायोग्य सोडवणूक करतील. यावेळी बाबासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुभाष पाटील, आक्काराम पाटील, मुख्याध्यापक हनुमंतराव जाधवर, मुख्याध्यापक विक्रम टकले, मुख्याध्यापकप्रकाश पालके, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांचे सर्व शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अनिल गेळे तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच एस पाटील यांनी मानले,कार्यक्रमाची सांगता पसायदान ने करण्यात आले.