fbpx

पुण्याच्या ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी आजपासून लागू

दयानंद गौडगांव:कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड: नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यातही वर्षाअखेर पार्टीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी आदेश जारी केला. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग,तळेगाव, चाकण एमआयडीसी ,हिंजवडी आयटी पार्क तसंच लोणावळा,ॲम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने या ठिकाणी रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *