बार्शी : वैराग ता बार्शी येथील विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या सोने – चांदीच्या दुकानावर बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात पंधरा हजाराच्या रोख रकमेसह सुमारे सहा ते सात लाख रुपयांची चांदी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वैरागमध्ये सराफ दुकानावर चोरट्याचा डल्ला, 7 लाखांचे दागिने लंपास
या दरोड्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर व उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले. गतवर्षी देखील येथेच चोरी झाली होती.