कुतूहल न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसह माल पळविणारी टोळी गजाआड
सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसह माल पळविणारी टोळी मधील 5 आरोपी जेरबंद 4 दिवसात दरोडा उघडकीस आणून, त्यांचेकडून चोरलेला 475 पोती कांदा, 12 चाकी ट्रक, इनोव्हा कारसह एकूण 43 लाख 82 हजार रू. असा एकूण 100 टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 19 डिसेंबर 2020 रोजी रात्री 10:30 वा. दरम्यान ट्रक चालक तयब लतीब फुलारी, वय 27 वर्ष रा. उमापूर ता. बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक हा आपले ताब्यातील 12 चाकी ट्रक केए-56-3633 मधून 25 टन कांदा लोड करून श्रीरामपूर जि. अहमदनगर येथून घेवून ते परतीपाडू विशाखा पट्टनम येथे पोच करण्यासाठी घेवून सोलापूर हैद्राबाद जाणाऱ्या रोडवर बोरामणी गांवचे पुढे जात असताना अचानक एक विना नंबरची सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार ट्रकला ओव्हरटेक करून, ट्रकला कार आडवी लावून कारमधून पाच पैकी चार इसम खाली उतरून चालक व क्लिनरला शिविगाळ करून त्या दोघांना ट्रक मधून खाली ओढून लाथाबुक्याने मारहाण करून, त्यांचे ताब्यातील कांद्याने भरलेले ट्रक जबरदस्तीने दरोडा टाकून घेवून गेले म्हणून तयब लतीब फुलारी याने फिर्याद दिले वरून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दरोडयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षकअतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सदरचा दरोडा उघडकीस आणणेबाबत विषेश पथक तयार करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे सपोनि शाम बुवा व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे गुन्हेगार हे सोलापूर शहरातील रामवाडी व रविवार पेठ सोलापूर येथील असून त्यांनी सदरचा गुन्हा करण्यासाठी त्यांचेकडील सिल्व्हर रंगाची इनोवा कारचा वापर करून गुन्हा केला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा यांचे पथकास कारवाई करणेकामी आदेशित केले होते. त्यानुसार सपोनि बुवा व त्यांचे पथकाने रामवाडी व रविवार पेठ भागातून पाच संशयित इसमांना इनोव्हा कारसह ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्हयातील ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांकडून गुन्हयात चोरीस गेलेला एकूण 475 पोती कांदा, चोरलेला 12 चाकी ट्रक केए-56-3633, गुन्हा करण्यासाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार नंबर एमएच 13 सीडी 3699 व त्यांचे वापरते मोबाईल असा एकूण 43 लाख 82 हजार रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांपैकी काही आरोपीतांवर सोलापूर शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहा.पो.उपनिरीक्षक खाजा मुजावर, पो हवा.नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोकॉ अक्षय दळवी, धनराज गायकवाड, रवि हाटकिळे, अन्वर अत्तार, चालक राहुल सुरवसे, राजेंद्र गव्हेकर यांनी केली आहे.