आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: ग्रामपंचायत निवडणूकांच्या अनुषंगाने पांगरी पोलिस ठाणेच्या वतीने कारी ( ता.उस्मानाबाद) येथील महादेव मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पाडा सहा. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांचे आवाहन
यावेळी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल म्हणाले की निवडणूकांच्या काळात सर्व पॅनल प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते यांनी आपल्याकडून कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी ग्रामपंचायत निवडणूक ही शांततेत पार पाडा, सोशल मीडियाचा तरुणांनी योग्य तो वापर करावा कुठल्याही चुकीच्या पद्धतीने माहिती ग्रुप वर शेअर करू नये. ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली तर गावच्या विकासासाठी चांगलेच आहे, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधसाठी सर्वांनी प्रयत्न करा. निवडणुकांच्या कालावधीमध्ये कोणी अनुचित प्रकार केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. सध्या चोर्यांचे प्रमाण वाढत असल्याने आपण दोन-तीन दिवसांत गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल तयार करत आहोत यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा त्यांना पांगरी पोलिस ठाणे कडून सर्व मदत करण्यात येईल.
यावेळी पोलीस पाटील अमृता माळी, तंटामुक्तीसमितीचे अध्यक्ष संजित डोके, खासेराव विधाते, डॉ देवेंद्र डोके, अमोल जाधव, अतुल चालखोर,पोहेकॉ. सतीश कोठावळे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कापसे गावातील ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.