कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत 6 जागा बिनविरोध; 9 जागांवर निवडणूक
पांगरी: बार्शी तालुक्यातील महत्त्वाची आणि 15 सदस्य असणारी पांगरी ग्रामपंचायतीत 6 जागा बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. 9 जागांची निवडणूक लागली आहे. 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.
बार्शी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायतपैकी एक पांगरी ग्रामपंचायत. या गावात लोकनेते रघुनाथ (दादा) पाटील व विकास आघाडी पॅनेल असे दोन राजकीय गट आहेत. सध्याच्या घडीला बिनविरोध निवडून आलेले लोकनेते रघुनाथ (दादा) पाटील गटाचे 4 तर विकास आघाडीचे 2 अशी विभागणी आहे. 9 जागांसाठी दोन्ही गट व अपक्ष मिळून 19 उमेदवार रिंगणात आहेत.
बहुमतासाठी लोकनेते रघुनाथ (दादा) पाटील गटाला 4 जागांची तर विकास आघाडीला 6 जागांची गरज आहे. मतदार राजा कोणाला कल देतो त्यावरच राजकीय भवितव्य ठरणार आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- प्रभाग क्रमांक एक माळी शैलजा राजकुमार, बगाडे मैनाबाई लिंबराज, गाढवे सुवर्णा संजय, प्रभाग क्रमांक चार कुंभार शुभांगी श्रीकांत, प्रभाग क्रमांक पाच देशमुख रामभाऊ भिमराव, बागवान रियाज दस्तगीर.
रिंगणातील उमेदवार- धस मिनिषा शहाजी, सरडे अनुराधा मधुकर, कदम भारत पिराजी, खवले धनंजय पंडित, गोडसे गणेश उत्रेश्वर, गोडसे रमेश रघुनाथ, पाटील संदीप बाळासाहेब, बगाडे भास्कर जगन्नाथ, बगाडे महादेव विठ्ठल, घोडके सुरेश किसन, जाधव सतीश रामचंद्र, गरड अर्चना अशोक, लाडे सुरेखा विलास, नारायणकर प्रमिला सोमनाथ,सोनवणे अंजली भगवंत,काकडे हिराबाई रमेश, पाटील वंदनादेवी जयसिंह, मोरे रेणुका बाळासाहेब, शेख रेशमा युसुफ.