fbpx

ध्येह साध्य करण्यासाठी परिश्रम केले पाहिजे : सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे

मालवंडी : मालवंंडी येेथील आनंदराव पाटील विद्यालयात श्री शेका गौरी परिवारातर्फे इयत्ता नववी आणि दहावी या वर्गासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बक्षिस वितरणासाठी  बार्शी  ग्रामीनचे  सहायक पोलीस  निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती त्यांच्या हस्ते बक्षीस  वितरण करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले की कुठल्याही परीक्षेची तयारी करीत असताना कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केले तर कुठलेही स्वप्न  साकार  होते  ज्या विषयात आपण कच्चे असतो त्या विषयाचा मन लावुन अभ्यास केला तर यश नक्की मिळू शकते. नववी व दहावीचे  हे वय आयुष्याला कलाटणी देणारे असते या वयात आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे व ते साध्य करण्यासाठी योग्य मार्गाने जाणे गरजेचे असते खेडेगावातील मुलांनी शहरी मुलाच्या तुलनेत न्यूनगंड न बाळगता आपण आपल्या ध्येह्या वर ठाम राहिले तर आपणही त्यांच्या मागे राहत नाही असा  सल्ला देत असताना साहेबांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. आयुष्यात मी कधी डगमगलो नाही खचलो नाही माझे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक संकटावर मात करत मी माझे ध्येय गाटले त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि भरपूर परिश्रम करून ते साध्य करा असे बोलून त्यांनी विद्यार्थ्याचे मनोबल वाढविले.

वेगवेगळ्या विषयाच्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नववी मध्ये पहिला क्रमांक मानसी संतोष दहीवडकर, दुसरा क्रमांक शिवानी बाबासाहेब काटे, तिसरा क्रमांक निकिता साहेबराव काटे, उत्तेजनार्थ राधिका सुनिल पवार, इयत्ता दहावी मध्ये पहिला क्रमांक साक्षी लक्ष्मण पाडूळे, दुसरा क्रमांक सुहाना अफसर मुजावर, तिसरा क्रमांक सिना गोपाळ सरवदे, उत्तेजनार्थ ज्ञानेश्वरी अशोक परीट या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केले. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *