आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजित डोके यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील शहीद जवान भागवत जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अमर रहे अमर रहे भागवत जाधव अमर रहे, भारत माता की, जय अशा घोषणा देण्यात आल्या.
कारीत प्रजासत्ताक दिन साजरा
तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण पोलीस पाटील अमृता माळी तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथिल ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, श्री शिवाजी विद्यालय व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय येथील ध्वजारोहण बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी पद्मजा राख हिच्या हस्ते, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील ध्वजारोहण शाखाधिकारी खळदकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ देवेंद्र डोके, खासेराव विधाते, राजाभाऊ गादेकर, राजेंद्र डोके, विजयसिंह विधाते, रविंद्र आटपळकर, ईलाई मुलाणी, श्रीकांत काळे, नितीन कात्रे, प्रदीप कदम, प्रकाश डोके, जि. प. प्रा. शाळेचे मुख्यध्यापक जाधवर, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भुसारे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उंमरदंड, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत चे कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.