काशीनाथ क्षीरसागर : कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंगशी वा. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मुंगशी : संपूर्ण भारत देशामध्ये २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंगशी (वा) ता.बार्शी येथे देखील भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय मुंगशी येथे सरपंच दिनेश राक्षे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक गणेश शिराळ, उपसरपंच आबा राक्षे, ग्रामपंचायत सदस्य उमेश बापू क्षीरसागर, उषा क्षीरसागर, छाया क्षीरसागर, निर्मला राक्षे, कोमल तुपेरे, परमेश्वर क्षीरसागर, धनाजी क्षीरसागर, चंद्रकला क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर आदी उपस्थित होते.
तसेच प्राथमिक शाळा मुंगशी येथे काशीनाथ क्षीरसागर व उपसरपंच आबा राक्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिनेश राक्षे, सुरज क्षीरसागर, साहेबराव भोसले, अंगद अंबुरे, मुख्याध्यापक मिरगणे आदी उपस्थित होते. तसेच मुंगशी विद्यालयात दिनेश राक्षे व मुख्याध्यापक धनवंत झालटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सुरज क्षीरसागर,बरचे, शिनगारे, पौळ, गवळी बापू, दुरगुडे मामा तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.