fbpx

प्रजासत्ताक दिनानिमित्त उडान फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : प्रजासत्ताक दिनानिमित्त ऊडान फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, या शिबीरात 272 रक्तदात्यांनी रक्तदान केले. नेहमी आपला ठसा सामाजिक कार्यात अबाधित ठेऊन उडान फाउंडेशन ही सामाजिक संघटना जनकल्याणासाठी कार्यान्वित असते.

या शिबीरामध्ये दिव्यांग व्यक्ती, महिला, पोलीस कर्मचारी, माजी सैनिक यांनीही रक्तदान केले. माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बार्शी नगर परिषदेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन रणवीर राऊत, नगरसेवक कय्युम पटेल, महेश यादव, पिनू काकडे, भैया बारंगुळे, गणेश नान्नजकर यांनी भेट दिली.

या शिबिराचा उत्साह पाहता भगवंत ब्लड बँकेच्या वतीने उडान फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी उडान फाउंडेश अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, सल्लागार इन्नुस शेख, शब्बीर वस्ताद, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, खजिनदार शोहेब काझी, रॉनी सय्यद, ॲड.रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोईन नाईकवाडी, सकलेन पठाण, बाबा शेख, इकबाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान,आयुब शेख, तोसिफ बागवान, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, रियाज बागवान, मोहसीन दिल्लीवाले, एजाज शेख, आबु पठाण, राजु शिकलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *