दयानंद गौडगांव:कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूरात वाहन चोरांची टोळी अटकेत; मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
अक्कलकोट : सोलापूर शहर , ग्रामीण तसेच उस्मानाबाद व कर्नाटकातील आळंद भागातील वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोलापूर गुन्हे शाखेनी केली आहे.
अमोल महादेव धोत्रे, रा.अणदुर ता.तुळजापुर व शरीफ मौला शेख ,रा .इटकळ ता. तुळजापूर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल ९ दूचाकी व १ चार चाकी असे एकूण ६,४५,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सोलापूर व परिसरात वाहन चोरीच्या घटना घडत होत्या. तसेच विविध पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्या अनुषंगाने सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दोन चोरटे डिस्टव्हर गाडीवर शहरात मंत्री चंडक पार्क जवळ येणार असल्याची माहिती एका गुप्त बातमीदारा कडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघा इसमांना अटक केले आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापु बांगर, सह पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार, संतोष फुटाणे, राकेश पाटील, शितल शिवशरण, विजयकुमार वाळके , संदिप जावळे (सर्व गुन्हे शाखा) आदींनी केली आहे.