बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नितीन गुंजाळकर यांना कै. मधुकर लोंढे स्मृती ससेमिरा ‘ राज्यस्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कै. मधुकर लोंढे यांनी गेल्या काही शतकात आपल्या लेखणीतून सत्य व सडेतोड लिखाणाच्या माध्यमातून अन्याय विरोधात लढा दिला , त्यासाठी त्यांना कारावास देखील झाला तरीही त्यांनी सत्य सोडले नव्हते. शासन दरबारी निव्वळ सत्य बातमी लिहिण्याचा ध्यास असल्याने कै. मधुकर लोंढे यांचा मोठा नावलौकिक अजूनही असून लोकाभिमुख पत्रकारितेमुळे जनतेत कायम आदर होता व आहे. त्यांच्यासारखा गुणवंत पत्रकार कायमस्वरूपी स्मरणात राहावा या उद्देशाने ‘ राज्यस्तरीय ससेमिरा गुणवंत आदर्श पत्रकार पुरस्कार’ ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ‘या राष्ट्रीय संघटनेतर्फे केंद्रीय, राज्य समितीने जाहीर केला आहे.
नितीन गुंजाळकर यांना ‘राज्यस्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर
बुलढाणा जिल्ह्यातील गुणवान पत्रकार नितीन गुंजाळकर(संपादक-अन्यायाचा पाठलाग) यांना या वर्षीच्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून मुंबई नगरीत ता.२ मार्च रोजी होणार असल्याची माहिती ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राज्यव्यापी पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांनी माहिती दिली. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून काौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.