fbpx

पेनूर येथे चंदनाची खरेदी विक्री करणाऱ्या तीन इसमांकडून मुद्देमाल जप्त

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर : पेनूर ता मोहोळ चंदनाची खरेदी विक्री करणाऱ्या तीन इसमांकडून २ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ०५ फेब्रुवारी  रोजी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील एक पथक मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध घेत होती. दरम्यान त्यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे पेनुर ता. मोहोळ येथील नागनाथ मंदिराजवळ चंदनाची खरेदी विक्री चालु आहे.  स्थानिक मोहोळ पोलीसांची मदत घेउन माहिती मिळालेल्या ठिकाणी जावून त्या ठिकाणी खरेदी विकी करीत असलेल्या ०३ इसमांना गराडा घालुन जागीच पकडले. सदर ३ इसमांच्या ताब्यात २३ किलो ४०० ग्रॅम सुगंधी चंदनच्या लाकडाचे तुकडे ०२ लाख ३४ हजार रूपये किंमतीचे, ५० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल, ०१ हजार रूपये किंमतीचे तराजु व वजने, २००/- रूपये किंमतीचे ०३ लोखंडी कुदळ असा एकुण ०२ लाख ८५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. गुन्हयातील ०३ आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आरोपी व मुद्देमाल मोहोळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोहवा नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोकॉ  धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चापोकॉ समीर शेख व मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोकॉ दळवी यांचे पथकाने सदरची कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *