पांगरी दि.23 : शिवछत्रपती विद्यामंदिर पांगरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौ. मंदाताई काळे उपस्थिती होत्या. याचबरोबर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योत्सना डोके या बरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर उपस्थित होते याचबरोबर अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे हे देखील उपस्थीत होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणी राजमाता जिजाऊ याच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी विशेष अशी उपस्थिती लावली, याचबरोबर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष रवींद्र कसपटे, केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड, राजेंद्र काळे सर, सदाफुले साहेब या मान्यवरांनी विशेष कार्यक्रमासाठी विशेष हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात शिवआरतीने करण्यात आली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्व, स्वछतेचे महत्व, देशभक्तीचे गीते, पोवाडे, लोकसंगीत, महापुरुषांच्या शौर्यगाथा, तसेच विविध समाजप्रबोधनात्मक नाटकें विद्यार्थ्यांनी सादर केले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष असे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काझी सर यांनी केले.