fbpx

छत्रपती ग्रुपच्या रक्तदान शिबीरात १६१ दात्यांचे रक्तदान

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती ग्रुपच्यावतीने भगवंत ब्लड बँक मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला ऐच्छीक रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरात १६१ दात्यांनी रक्तदान केले. प्रतिवर्षी छत्रपती ग्रुप च्या वतीने विविध विधायक उपक्रम राबविले जातात यापूर्वी या ग्रुपने गरजू महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप केले होते, अनेक मुलींच्या नावावर मुदत ठेव रक्कम ठेवने आदि कल्याणकारी उपक्रम राबविले होते. रक्तदानाचे उद्घाटन सचिन वायकुळे, भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांच्या हस्ते झाले. हे रक्तदान शिबीर बापूसाहेब पाटील व पिंटू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

यावेळी बापूसाहेब पाटील, पिंटू राऊत, भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, संदीप बरडे आदी उपस्थित होते.यावेळी छत्रपती ग्रुप च्या विविध उपक्रमाचे ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी कौतुक केले . शिबिराच्या यशस्वितेसाठी राम पाटील, सारंग चौगुले ,रोहित वाघमारे, राज देवकुळे, अजिंक्य डाके, सुरज व्हळे,आकाश जाधव ,सिद्धेश्वर आलाट, समाधान राऊत ,विनोद काकडे ,गणेश कदम, गणेश कोल्हे ,संदीप शाहीर, दीपक अतकरे सह छत्रपती ग्रुप चे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *