दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
तंबाखू मुक्त शाळा अभियानात नाविंदगी तांडा मराठी जिल्हा परिषद शाळेचा अक्कलकोट तालूका व नागणसूर केंद्रा मधून प्रथम क्रमांक
नाविंदगी : भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातून व नागणसूर केंद्रातून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नाविंदगी तांडा २०२१-२३ या शैक्षणिक वर्षात पहिली शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक महावीर उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षिका अमिता खडतरे, शिवानंद कुंभार, सर्व विद्यार्थी यांनी सुधारीत ९ निकषानुसार तंबाखूमुक्त शाळा अभियान शाळेत राबविले आहे. नाविंदगी तांडा जि.प.प्राथमिक शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून अक्कलकोट तालूक्यात व नागणसूर केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, शिक्षणविस्ताराधिकारी सुहास गुरव, केंद्रप्रमुख गुरुनाथ नरुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य, गावाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनी शाळेचे अभिनंदन केले.