वैराग प्रतिनिधी ( काशीनाथ क्षीरसागर ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बार्शी आगार व श्री डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी आगार येथे अपघात सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने चालक, वाहक तसेच एस.टी कर्मचारी व अधिकारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी साठी नेत्र रोग तज्ञ डॉ. अमर खेंदाड ( वैरागकर) व नेत्र चिकित्सक स्वप्नील उबाळे हे उपस्थित होते. तसेच या शिबिराच्या आयोजनासाठी आगार व्यवस्थापक मोहन वाकळे, बस स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ, विजय बुटे, महेंद्र क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले. या नेत्र शिबिराचा शंभर हुन अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.