fbpx

डॉ. बी. वाय. यादव यांचा जीवनगौरव पुरस्काराबद्दल कुतूहल परिवाराच्या वतीने सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बी. वाय. यादव यांना मिळाला. त्याबद्दल कुतूहल परिवारचे अध्यक्ष प्रा.विलास जगदाळे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला.

विद्यापीठात पार पडला ऑनलाइन दीक्षांत सोहळा !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत सोहळा सोमवारी (ता. 22) ऑनलाइन पार पडला. यावेळी राजभवनातून राज्यपाल कोश्‍यारी यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *