पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आमदार राजेंद्र राऊत प्रणित लोकनेते रुघुनाथ (दादा) पाटील पॅनेलच्या सुरेखा लाडे तर उप सरपंच पदी धनंजय खवले यांची बिनरोध निवड झाली आहे.
पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधरण महिलेसाठी राखीव होते. या जागेसाठी लाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्या अविरोध निवडून आल्या तर उपसरपंचच्या पदासाठी खवले यांचा एकमेव अर्ज असल्याने ते अविरोध निवडून आले. तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत ही एकूण १५ सदस्य संख्या असणारी मोठी ग्रामपंचायत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. लोकनेते रुघुनाथ (दादा) पाटील पॅनेलने बहुमताच्या बळावर ग्रामपंचायत काबीज केली. आमदार राजेंद्र राऊत, ॲड. अनिल पाटील, प्रा.विलास जगदाळे, प्रा. संजीव बगाडे, विजय गरड, सुहास देशमुख, तात्या बोधे, रामा लाडे, जयंत पाटील, बाबुराव गोडसे, अंकुश लाडे, गणेश काळे आदींनी मोलाची भूमिका पार पाडली.