fbpx

यावली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रुपाली तुरे तर उपसरपंच पदी निवेदिता उकरंडे यांची बिनविरोध निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: तालुक्यातील यावली (दु) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कै.कळबट सर ग्रामविकास पॅनेलने विरोधकांचा ९- 0 ने पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळविले.

आज दि.२६ फेब्रुवारी.रोजी सरपंच व उपसरपंच पदाची शांतता व सुव्यवस्था राखत बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदी रुपाली अमित तुरे तर उपसरपंचपदी निवेदिता सचिन उकरंडे या युवा महिलांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त ग्रा.पं.सदस्य अमित सरवदे, शरद काकडे, जब्बार बागवान, आप्पा मांजरे, वैशाली गायकवाड, सुवर्णा सरवदे, माधुरी उबाळे, प्रल्हाद तुरे, शरद कळबट, भागवत उकरंडे, जयहिंद खरात, राजेंद्र तुरे, प्रा.रमेश काकडे, ईलाई मुलाणी, दादा सरवदे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश उबाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *