कुतूहल न्यूज नेटवर्क
आदर्शगाव मळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ज्योती माळी यांची निवड
मळेगाव (अशोक माळी) : महाराष्ट्र राज्यात आपल्या विकासाच्या जोरावर नाव कमावलेल्या मळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ज्योती संजयकुमार माळी तर उपसरपंच पदी धीरज रमेश वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच ज्योती माळी यांचा सत्कार माजी उपसरपंच भाऊसाहेब म्हमाणे यांच्या हस्ते करण्यात आला व उपसरपंच धीरज वाघ यांचा सत्कार आण्णासाहेब निंबाळकर व प्रगतशील बागायतदार संतोष गाभने यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात नावाजलेली व गेल्या ४५ वर्षांपासून बिनविरोध असणारी ग्रामपंचायत अशी ओळख परंतु, ह्या पंचवार्षिक निवडणूकीत गावातील जेष्ठ मंडळींनी गाव बिनविरोध करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले व ४५ वर्षाची परंपरा खंडित झाली. ग्रामपंचायतची निवडणूक लागली, बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून केलेले रक्तदान शिबीर, ग्राम स्वच्छता अभियान, एक गाव एक गणपती, जि.प.शाळेला केलेली मद्दत, गरजू व्यक्तीला केलेली आर्थिक मदत, कोरोनाच्या काळात कायमस्वरूपी सुरू करण्यात आलेल्या नर्मदेश्वर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधार लोकांसाठी दोन वेळचे जेवण, गावच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन, सुकन्या योजनेच्या माध्यमातून दिलेली मद्दत, गावाला दिलेली निवडणूकीतील आश्वासने पूर्ण करत आशा अनेक सामाजिक कामाच्या जोरावर गावकऱ्यांनी श्री नर्मदेश्वर नागनाथ महाराज ग्राम विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी केले. बाळासाहेब माळी यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा गावचा विकास करण्याची संधी गावकऱ्यांनी विजयी उमेदवारांना दिली.
यावेळी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, उद्दोजक राजकुमार मुंबरे माजी उपसरपंच भाऊसाहेब म्हमाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावचे ग्रामदैवत नागनाथ महाराज मंदिरामध्ये सत्कार कार्यक्रमात सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गंगूताई माळी, अध्यक्ष अंकुश माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, उपाध्यक्ष नितीन पवार, माजी सरपंच संतोष निंबाळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, भाऊ पाडुळे, प्रगतशील बागायतदार दिगंबर भराडे, राजाभाऊ फपाळ, श्रीमंत पाडुळे, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, समाधान पाडुळे, आदम बागवान, मारुती देवकते, आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अकबर शेख यांनी मानले.