fbpx

शेळगाव (आर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभावती बादगुडे तर उपसरपंच पदी शाहू कचरे यांची बिनविरोध निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंगशी  (काशीनाथ क्षीरसागर) : तब्बल वीस वर्षानंतर सत्तांतर झालेल्या शेळगाव (आर)  ता. बार्शी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सुरेश अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलने ११ जागा पैकी ६ जागेवर उमेदवार निवडून आणून सत्तापरिवर्तन केले आहे. काल झालेल्या सरपंच निवडीमध्ये प्रभावती विजय बादगुडे यांची सरपंचपदी तर शाहू अप्पासाहेब कचरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी मंगल नागणे, शोभा देडे , राजाभाऊ गायकवाड ,नानासाहेब सपाटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी विजय बादगुडे, सुरेश अडसुळ, बाळासाहेब गायकवाड,  प्रकाश गायकवाड, शिवाजी जाधव ,सचिन बादगुडे, भानुदास नागणे, रवींद्र सपाटे, किरण कदम, संतोष सोनार आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाथवटे व ग्रामसेवक गोपाल सुरवसे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *