fbpx

सहायक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील सुपुत्र व सद्या सोलापूर याठिकाणी कार्यरत असलेले सोलापूर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली.

“पोलीस खात्यामध्ये गडचिरोलीला नक्षलवादी भागात जाण्यासाठी लोक नको म्हणतात परंतु मी विनंती करून पोलीस निरीक्षक प्रमोशन वर मला गडचिरोली येथे सेवा करण्याची संधी मिळावी अशी विनंती करून मी त्या ठिकाणी चाललो आहे.” नूतन पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील

कोरोना महामारी च्या काळात केलेल्या दमदार कामगिरीमुळे पुणे याठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते विजयानंद पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. पाटील हे गेल्या १२ वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालय मुंबई, सीआयडी उस्मानाबाद, शहर वाहतूक शाखा सोलापुर शहर, पोलीस आयुक्त वाचक याठिकाणी सेवा केली आहे. त्यांनी स्वतःहून गडचिरोली या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती बदली त्यांची करण्यात आली आहे विजयानंद पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *