सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकार ८० कोटी लोकांना गहू २ रुपये किलोने देणार, तांदूळ ३ रुपये किलोने देणार
आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.