कुतूहल न्यूज नेटवर्क
वेब सिरीजमध्येही बार्शीची एंट्री, भन्नाट विनोदी सुमडीत कुमडी चा ७ भाग येथे पहा
बार्शी : बार्शीला मोठा सांस्कृतिक वारसा आहे, त्यामुळेच नाटकांपासून ते चित्रपटाच्या दिग्दर्शनापर्यंत बार्शीकरांनी स्वत:ला सिद्ध केलंय. आता, नव्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही बार्शीकर मागे नाहीतच. त्यामुळे, खास रे टीव्हीच्या माध्यमातून बार्शीचा डोनाल्ड तात्या जगभरात पोहोचला. तर काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिला मराठी चित्रपट म्हणून, विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा मांडणार प्रणीत देशमुख या बार्शीकराचा ‘सर’ प्रदर्शित झाला. आता, वेब सिरीजच्या माध्यमातूनही एक युवक दिग्दर्शक पुढे येत आहे. आगळगावच्या ग्रामीण मातीतील या तरुण दिग्दर्शकाने ‘सुमडीत कुमडी’ नावाची वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलीय. गाव गाड्याच्या गोष्टी सांगणाऱ्या या वेब सिरीजचं अनेक दिग्गजांकडून कौतुक होतंय.
कोरोनामुळे पुण्यातून आपल्या गावी आल्यानंतर काहीतर करायचा विचार डोक्यात आला अन् डिजिटल प्लॅटफॉर्मचाच पर्याय दिसला. त्यातच, नेटफ्लिक्स, एमेझान प्राईम, एमएक्स प्लेअर यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म व युट्यूब आणि फेसबुकला लोकांची पसंती पाहून ‘सुमडीत कुमडी’चा मुहूर्त ठरला. लॉकडाऊनमध्येच १५ ऑक्टोबर २०२० रोजी आम्ही “सुमडीत कुमडी” या वेब सेरीज च्या पूर्व तयारीला सुरुवात झाली. त्यामध्ये ऑडिशन, लोकेशन करून 25 ऑक्टोबर २०२० रोजी शूटिंगला सुरुवात झाली. खेड्यातील रोजच्या जीवनातील बरेच जीवंत प्रसंग उभा करून विनोदी कथेतून प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न या वेब सेरीजमधून रोहित आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलाय. गावातील राजकारण, गावातील तरुण मंडळीचा चाललेला कट्ट्यावरील गोंधळ, गावची भांडखोर मावशी ही अगदी हुबेहूब वाटणारी पात्रं त्यांनी साकारली आहेत. तसेच, आबा पाटील यांसारखा गावात दरारा असणारा माणूस आणि त्यांचे डॅशिंग संवाद, तर सरपंच बाबुराव आपटे यांचा लालचीपणा आणि गोट्या नावाचं गबर्दंड असणार सरपंचांच्या मुलाचं कॅरेक्टर
गावात सगळ्यांना त्रास देणारी आबाची मुलगी प्राजी ही मालिकेची नायिका तर स्वप्नांच्या दुनियेत जगणारा गणप्या म्हणजे मालिकेचा नायक. लहरी मित्र मंडळाचे सदस्य असणारी त्यांची मित्र मंडळी. गावाकची प्रेमकथा, तरुण मंडळं, गावच्या समस्या, गावात येणार्या नवीन अडचणींवर तरुणाईकडून निघणार तोडगा, खलनायक असणार्या रव्याची भांडणं. प्रेम, वाद, संवाद, विनोद, भांडण आणि आपलेपणाने सजलेली सुमडीत कुमडी प्रत्येक भागागनीक आपली उत्कंठा वाढवते. या वेब सिरीजचे लेखन/ दिग्दर्शन/ निर्मिती/ कला दिग्दर्शन हे सर्व २१ वर्षीय रोहित देशमुखने केले आहे. तर, प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतिभा लट्ठे ही महाड (रायगड) ची असून लकी पाटील, एकनाथ सुरवसे, अक्षय कदम, मयूर काळे, श्रावण बोरडे, राजेश पवार, सचिन माळी, सुवर्णा शिवपुरे , साक्षी वाघमारे, दिव्या स्वामी, भूषण आठवले, गणेश रामपुरी, गणेश शिंदे, महेश कोरे, विजय काकडे, सोहेल पठाण, इत्यादी कलाकार हे पुणे, सोलापूर, मोहोळ, बारामती , परांडा, कोरेगाव , उपळे, बार्शी अश्या वेगवेगळ्या भागातून आहेत.
वेब सेरीज मधील दोन गाणी अतिशय सुंदर आहेत. त्यापैकी, “झाली सुमडीत कुमडी” या टायटल गाण्याचे लेखन- विनोद गायकवाड, संगीत–अजित शेळके, गायक–तेजस जगदाळे यांनी केल आहे. तर, “तू होशील का माझी घरवाली” या आयटम गाण्याचे लेखन–रोहित देशमुख, संगीत–अजित शेळके, गायिन–राजेश्वेरी पवार या सूप्रसिद्ध गायिका यांनी केलंय. “Confidence Film Production” या YouTube चॅनेलवर १० भागांची ही वेब सिरीज पाहिल्यानंतर प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतीला तोड दिल्याचा साक्षात्कार तुम्हाला झाल्याचं दिसून येईल.
या वेब सिरीजसाठी पत्रकार सचिन वायकुळे, मातृभूमीचे संतोष ठोंबरे, महेश यादव यांनी खूप सहकार्य केल्याचं दिग्दर्शक रोहित देशमुख यांनी कुतूहल शी बोलताना सांगितलं. खूप सार्या तांत्रिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करत १७ जानेवारी रोजी सुमडीत कुमडी प्रेक्षकांना हसवायला, रडवायला, प्रेम शिकवायला आणि तंटा मिटवायला आली आहे. आता, बार्शीकरांनी आपल्या भूमिपुत्राच्या कामाचं कौतुक किंवा टीका करण्यासाठी तरी ही वेब सिरीज पाहावी, जास्तीत जास्त शेअर करुन आपली प्रतिक्रिया द्यावी, अशी विनंती दिग्दर्शकाने केलीय.
भाग 7 –