fbpx

माध्यमांमध्ये जरी तांत्रिक बदल झाले तरी पत्रकारितेचा मुळ गाभा जुनाच – राजा माने

कुतूहल न्यूज नेटवर्क

वैराग (काशीनाथ क्षीरसागर) : माध्यम क्षेत्र सध्या बदलाच्या नव्या वळणावर उभे आहे, भविष्यात यामध्ये काय बदल होतील हे कोणालाही ठाम सांगता येणार नाहीत. या पार्श्वभूमिवर ग्रामीण पत्रकारांनी या बदलाचा स्वीकार करून आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला प्राध्यान्य देत पत्रकारीता केली पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ संपादक राजा माने यांनी साप्ताहिक बार्शी परिवर्तनच्या वर्धापन दिनानिमित्त केले. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब बादगुडे होते .

राजा माने पुढे बोलताना, माध्यमांमध्ये तांत्रिक क्रांती घडून तांत्रिक प्लॅटफॉर्म आले, तांत्रिक बदल होत गेले परंतू पत्रकारितेचा आत्मा तोच कायम राहिला आहे. हा आत्मा कायम ठेवण्याच काम मेट्रो सिटी पासून गावपातळीवर च्या पत्रकाराच्या हातात आहेे. ज्याला ज्या कामासाठी, ज्या पध्दतीने माहिती मिळते ते माहिती देणारे माध्यम म्हणजे सध्याची पत्रकारिता होय .

कार्यक्रमास दलित मित्र प्रशांत भालशंकर ,डॉ. राजेंद्र बाजारे, वैद्य अपेक्षा गुंड, पुढील सर्व पत्रकार आनंदकुमार डुरे, शांतीलाल काशीद, मल्लीनाथ धारूरकर, इरशाद शेख, विजय कोरे, सुहास ढेकणे, अण्णासाहेब कुरुलकर, सतीश बुरगूटे, गणेश अडसूळ, शंकर धावारे, गणेश मसाळ, विशाल पवार आदी विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पुढील सर्व कवी जीवन धेंडे, हर्षदा पिंपळे, संभाजी आवारे, संजयकुमार भालेराव, नवनाथ खरात, प्रा .इंद्रजित पाटील अनिल घोडके, अनिल गुंड, प्रा. अभिजित पाटील, मनोज मुळे उपस्थित होते. सुत्रसंचालन  प्रा. सुहास ढेकणे यांनी तर प्रास्ताविक व आभार बलभीम लोखंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *