fbpx

ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात महिला दिन साजरा

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नीलम कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील उपस्थित होते. यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथपाल अविनाश कावळे, पुष्पराज यादव, राजेश पवार, परीक्षितराजे विधाते, पुष्पा देसाई, रत्नमाला विधाते, सविता जगताप, वनमाला विधाते , राणी वायकर, सलिमा पटेल, ग्रा पं सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण गादेकर, महेश येडवे, महेश व्हटकर, तुषार माने, बाळासाहेब गादेकर, गजानन गंभीर, बापू वाघे यांनी परिश्रम घेतले. आभार संतोष जगदाळे तर सूत्रसंचालन आसिफ मुलाणी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *