fbpx

कारीत घरफोडी दोन लाखांचे ऐवज लंपास

कुतूहल न्युज नेटवर्क

कारी प्रतिनिधी (आसिफ मुलाणी ):कारी ता.जि.उस्मानाबाद येथे एकाच रात्रीत दोन घरे फोडुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा दोन लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार दि.१७ बुधवारी रोजी सकाळी उघडकीस आला.

शिवाजी ज्योतीराम माने (वय ६५वर्षे) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १६ मार्च रोजी रात्रौ ९/०० वा. चे सुमारास सर्वजण जेवण करून शेतात ज्वारी काढणेचे काम चालु असल्याने ते शेतात झोपणे करिता गेले तर दोन सुना व त्यांची पत्नी  किचनचे खोलीला बाहेरून कुलुप लावुन शेजारचे खोली मध्ये झोपले होते. दि १७ मार्च रोजी सकाळी ०६/०० वाजता सुन उठली. व घरासमोरील अंगण झाडत असताना तिला किचनचा दरवाजा उघडा असलेला दिसला. त्यानी सदर खोली मध्ये जावुन पाहिले असता किचन रूम मध्ये ठेवलेले गोदरेजचे कपाट उघडे असलेले दिसले व त्यातिल सामान व कपडे खोली मध्ये आस्थाव्यस्त पडलेले होते. फिर्यादीने घरी येवुन पाहिले असता गोदरेजचे कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४ हजार रूपये हे मी ठेवलेले ठिकाणी मिळुण आले नाही. तसेच घरातील कपडे व इतर कागदपत्रे घराचे पाठीमागे शेता मध्ये पडलेले दिसले. त्यानंतर खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरटयाने आमचे कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे.

तसेच आमचे शेजारी राहणारे सतिश अभिमुन्य सारंग यांचे दोन मोबाईल पण चोरीस गेले आहेत. चोरट्यांनी ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे दोन फुलेझुबे जोड,२४ हजार५०० रुपयांच्या ७ ग्रॅम वजनाच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या जु.वा.कि.अं. ४५१००१, ८७,५०० रुपयांचे एक अडीच तोळे वजनाचे साखळीतील गंठन, १७,५०० रु अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मण्याचे गंठन, ४,००० रू रोख रक्कम व १०,००० रू दोन मोबाईल असा ऐवज बंद घराचे कुलुप कडी कोयंडा  तोडुन आत प्रवेश करुन घरातील १,८६,००० रू.चे व आमचे शेजारी राहणारे ,सतिश अभिमुन्य सारंग यांचे बाहेरील दोन मोबाईल किंमत १०,०००/- रु किंमतीचे असे सर्व मिळुन १,९६००० /- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे कोणीतरी अज्ञात चोरट्यानी संमती वाचुन मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहे. अज्ञात चोरट्याविरुध्द पांगरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *