fbpx

पोपट काळे यांचा प्रामाणिकपणा; जास्तीचे पंधरा हजार बँकेला केले परत

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील पोपट बलभीम काळे हे या गावातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेत पंधरा हजार रुपयांचा विड्रॉल भरून दिला. त्यांना बँकेकडून रक्कम देण्यात आली. काळे यांनी ती रक्कम मोजली असता रक्कम तीस हजार रुपये आढळून आली. बँकेकडून आपल्याला जास्तीची पंधरा हजार रुपयांची रक्कम आलेली आहे हे लक्षात येताच त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत जास्तीची पंधरा हजार रुपये आलेली रक्कम कारी शाखेचे शाखाधिकारी व्ही.एस. खळदकर यांच्याकडे सुपूर्त केली. काळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे बँकेला रक्कम परत मिळाली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र आज कौतुक होत आहे.

काळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल कारी शाखेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे शाखाधिकारी व्ही. एस. खळदकर, डॉ देवेंद्र डोके, लिपिक आबासाहेब घावटे, सेवक परमेश्वर गपाट, काका काळे, बालाजी येडवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *