कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी येथे वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आरटीओ यांना निवेदन
बार्शी : बार्शी मधील प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांना युवासेना नेते शहराध्यक्ष दिपक आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. पांगरी, पानगाव, उपळे, दुमाला, परांडा, लोणी, सौंदरे, दडशिंगे व मांडेगावमधील चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनामध्ये क्रुझर या गाडी साठी नऊ ते दहा आसनांचे परमिट द्यावे, तसेच सध्या मार्च एण्ड मुळे जी कारवाई चालू आहे ती थांबवावी अशा स्वरूपाचे निवेदन दिले आहे.
यावेळी नवा बोरगावकर, ताजुद्दीन शेख, औदुंबर जाधव, बापू गव्हाणे, आबा तांबे, बाबा मिरगणे, राजाभाऊ उमरदंड, पप्पू मिरगणे, महेश भोसले, बाळासाहेब देवगुंडे, नाना शेंडगे, बाळासाहेब गोसावी, नागेश बिराजदार, मनोज काळे, महेश देशमाने, प्रकाश मांजरे, महादेव भोसले, राहुल बरबडे, संदीप नाळे, गणेश पवार, धनु कुंभार, सुनील यादव, सुरेश चव्हाण, रामेश्वर बुरगुटे, सोहेल शेख, समीर शेख, हनुमंत कदम, शरद जाधवर, रमेश भोसले, सुरेश जाधव. आदीसह बार्शी शहर व तालुक्यातील वाहन चालक मालक व जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.