पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी पंचक्रोशीतील रक्तदान शिबीर सामाजिक अंतर ठेवून संपन्न
पांगरीतील श्री दिलीपरावजी सोपल सांस्कृतिक क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, पांगरी व पांगरी पंचक्रोशी आयोजित रक्तदान शिबीर स्व.शोभाताई सोपल इंग्लीश स्कूल, पांगरी येथे रविवार दि. 5 रोजी संपन्न झाले.

सुरुवातीला सरस्वती प्रतिमा पूजन सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले. शिबीरास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट, ग्रामविकास अधिकारी राहुल गरड, पोलीस कर्मचारी अर्जुन कापसे , धनंजय तौर, किरण चौधरी,बालाजी मुळे व संस्थाध्यक्ष विनायक गरड तसेच सर्व रक्तदाते उपस्थित होते.
उपस्थित सर्वांना हुंदळेकर यांनी आवाहन केले की, घरा बाहेर निघू नका. आपली व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बरोबरच गावातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे घरा बाहेर पडू नका. भारताबरोबर जगातील या महामारी ‘कोरोनाला’ सामोरे जाण्यास आपण समर्थ आहोत. फक्त सर्व जनतेनी शासन आदेशाचे पालन करणे जरूरीचे आहे. तसेच बाहेर किराणामाल खरेदी व दवाखान्यात जाताना आपल्या व इतर व्यक्तीमध्ये 3-4 फुटाचे अंतर पाळा. बाहेरून घरात आल्यानंतर आपले हात सॅनिटायझरनी किंवा साबनाने स्वच्छ करा. अकारण गाडी घेवून घरा बाहेर पडाल तर आपली गाडी जप्त केली जाईल. वयस्कर व लहान मुलांची जास्त काळजी घ्या,असे सामाजिक उपक्रम राबवल्या बद्दल संस्थेचे व सर्व आयोजकांचे आभार व्यक्त केले.
विनायक गरड यांनी उपस्थित पाहुणे, ग्रामस्थ व रक्तदाते यांचे आभार मानले. आणि सर्वांना घरीच राहण्याची विनंती केली. तसेच शिबीरात एकूण 35 दात्यानी रक्तदान केले.श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांनी प्रत्येक रक्तदात्यांना सॅनिटायझर व प्रमाणपत्र दिले.
शिबीर पारपाडण्यासाठी डॉ.रवि गिराम, किरण चौधरी, गणेश घावटे, नितीन वाघमारे, नागेश काशीद, सचिन मोरे , ज्ञानेश्वर काळेल यांनी परिश्रम घेतले.