कारी (आसिफ मुलाणी): आंबेजवळगे ता उस्मानाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार दि 7 पासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आंबेजवळगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस कोरोना प्रतिबंधक लस 45 वयापेक्षा पुढील नागरिकांना देण्यात येणार आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात बुधवारी करण्यात आली.
यावेळी सरपंच आंनद कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव, आरोग्य कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी लसीकरणासाठी गावातील 45 पुढील नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन सरपंच आनंद कुलकर्णी यांनी केले आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत आहे. ही लस सुरक्षित आहे. शरीरावर त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. असे लस घेतलेल्या नागरिकांचा अनुभव आहे. नागरिकांनी येताना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड घेऊन यावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.