कारी(आसिफ मुलाणी): राज्यामध्ये शेती क्षेत्रात कार्य करणारी कृषिदूत बायो हर्बल नाशिक प्रा लि या कंपनीकडून उस्मानाबाद तालुक्यातील कारी ग्रामपंचायतीला गावांमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईड लिक्विड देण्यात आले. मागील वर्षीही या कृषिदूत कंपनीने विविध गावामध्ये 200 लिटर सोडियम हायड्रोक्लोराईड लिक्विड आणि सॅनिटायझर स्टँड चे वाटप केले होते.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहवयास मिळत आहे. गावामध्ये जंतूनाशक औषधांची फवारणी व्हावी या उद्देशाने कृषीदूत कंपनीने सामाजिक बांधिलकी याही वर्षी सोडियम हायड्रोक्लोराईडलिक्विड चे वाटप करताना पाहवयास मिळत आहे. यावेळी अनिल कदम, कृषिदूत कंपनीचे प्रतिनिधी अलिम मुजावर, बालाजी मुंढे, शशिकांत माळी, प्रदीप कदम, नितीन कात्रे यांच्यासह ग्रा पं कर्मचारी आदी उपस्थित होते.