कुतूहल न्यूज नेटवर्क
गुळपोळीत क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
बार्शी: बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मण काळे तर अध्यक्ष गणेश लंगोटे हे होते. प्रमुख उपस्थिती सागर चौधरी, सुमित माळी व आदेश भालशंकर होते.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण प्रमुख पाहुणे लक्ष्मण काळे व गणेश लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, गणेश लंगोटे, गुलाब शेख, किरण खुरंगळे, सुमित माळी, समर्थ ढावारे, सचिन शिंदे, सागर चौधरी, सचिन राऊत, नागनाथ फोके, अमित काळे आदी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर प्रस्तावना व आभार भैरवनाथ चौधरी यांनी मानले.