बार्शी : कुतूहल न्यूज नेटवर्क
एम आय टीचा विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ अभ्यासवर्ग सुरु
श्रीमती प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मिडीयम हायस्कूल बार्शी येथील शिक्षकांच्या ऑनलाईन क्लासद्वारे नियमित विद्यार्थी अभ्यासवर्ग सुरू. जगभरात सध्या कोविड 19 व्हारसने थैमान घातल्यामुळे कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी देश लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशाची पिढी घडवणाऱ्या शाळा बंद असल्या तरी एम.आय. टी. ,बार्शी येथील शिक्षकांनी दि. 3 एप्रिल पासून लॉकडाऊन चे नियम पाळत स्वत:च्या घरात राहुन ‘ऑनलाईन क्लास’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. ह्या द्वारे सर्व शिक्षकवृंद स्वत:च्या घरात बसुन सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या घरी ऑनलाईन पोहोचत विद्यार्थ्यांना ‘लर्न फ्रॉम होम’ चा अनुभव देत आहेत. सोबतच मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर देत मूल्य शिक्षणाचे , अभ्यासाचे , योगा , चित्रकला , संगीत, संगणक यासारख्या विषयांचे देखील उपक्रम ,चर्चासत्र आणि परिसंवाद विद्यार्थ्यांसोबत होत आहेत. विध्यार्थी स्वत:ची काळजी घेत घरामध्ये सर्वांना मदत करून घरच्यांच्या सूचनांचे पालन करत वेळ घालवण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय JEE , MS-CET च्या प्रतीक्षेत असलेल्या 12वी च्या विद्यार्थ्यांची देखील ऑनलाईन रिवीजन व सराव चाचण्या शिक्षक घेत आहेत. पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे अशी माहिती प्रशालेच्या प्राचार्या वृंदा मुलतानी-जोशी यांनी दिली.