कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत 50 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू
पांगरी: पांगरी ता.बार्शी येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तेथेच जवळपासच उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने पांगरीतील जिल्हा परिषद शाळेत 50 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना या मुळे आरोग्यसेवा व सुविधा मिळणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
पांगरीच्या ग्रामीण रुग्णालयात 20 ऑक्सीजन बेडची उपलब्धता असून पांगरी व या परिसरातील 15 गावांतील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. पांगरी येथे 50 बेडच्या कोवीड केअर सेंटरला आ. राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. त्याठिकाणी असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून अडी-अडचणींची माहिती घेऊन, काही बाबींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सुनील शेरखाने ,पं.स. सभापती अनिल डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, सपोनी सुधीर तोरडमल, पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रवींद्र माळी, ग्रामसेवक संतोष माने, डॉ.गायकवाड, तलाठी श्रीकांत शेळके, ॲड. अनिल पाटील, विलास जगदाळे, सरपंच सुरेखा लाडे, उपसरपंच धनंजय खवले, संजीव बगाडे, सुहास देशमुख, सतीश जाधव, जयंत पाटील, रियाज बागवान, विलास लाडे, शहाजी धस उपस्थित होते.