पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारीत जुगार अडु्यावर छापा; पाच जण ताब्यात एक फरार
पांगरी : संचारबंदीचे आदेश डावलून कारी ता बार्शी येथील पोपट कोळी यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली तिरट नावाचा जुगार खेळताना छापा मारून पाच जणांवर कारवाई केली,एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला, घटनास्थळावरून १ लाख ३२ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीत नागरिकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. असे असतानाही काही व्यक्ती कारी येथील पोपट कोळी यांच्या शेतात तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या ठिकाणी छापा मारला असता तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले.पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना गराडा घालून पकडले. पोपट श्रीरंग गेंड (वय ३५),प्रशांत दिलीप जाधव (वय ३६),अरुण पांडुरंग लोंढे (वय ३७), महेश जनार्दन गेरडे ( वय २४) यांना ताब्या घेतले. बबन ऊर्फ प्रशांत शामराव माने हा पळून जाण्यात यशस्वी झाला.यावेळी रोख रक्कम, तीन दुचाकी, ३ मोबाईल असा १ लाख ३२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
जुगार खेळताना आढल्यास कठोर कारवाई करण्यात येइल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.