मळेगाव (अशोक माळी): मळेगाव ता. बार्शी येथील सामान्य कुटूंबामध्ये जन्मलेल्या निलेशने यश संपादन करून समाज्यापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. निलेशने महाराष्ट्र शासन, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ कार्यालय पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केले व त्यांची बार्शी तालुक्यामध्ये बार्शी ग्रामीण रुग्णालय येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच संजयकुमार माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच धीरज वाघ, यशोदीप सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक रशीद कोतवाल, सावता परिषद युवक अध्यक्ष अशोक माळी, ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे, दशरथ इंगोले, मंडळाचे गिरीश माळी, यशवंत गाडे, अमोल पवार आदीं मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.