कुतूहल न्यूज नेटवर्क
कारीतील युवकांनी बनवली भन्नाट विनोदी ‘मी नाय त्यातला’ ही वेब सिरीज
कारी (आसिफ मुलाणी): ग्रामीण भागात नटखट व्यक्तिरेखा असतात तशाच अंगात सिनेमा घुसलेले काही नट ही असतात. अभिनयाचा बाज असूनही वाव मिळत नसलेल्या गावगाड्यातील अशा कलाकारांसाठी वेब सिरीज एक चांगला प्लॅटफार्म ठरत आहे. यातूनच उस्मानाबाद तालुक्यातील कारी या गावातील युवकांनी एकत्र येऊन वेब सिरीज करण्याचा निर्णय घेतला. अमोल लोहार आणि मयुर कावळे यांनी आपल्या गावामध्ये, आपल्या मातीमध्ये, गावातील व गावाशेजारील कलाकार यांना एकत्र घेऊन ‘मी नाय त्यातला’ या वेब सिरीला सुरूवात केली. दिग्दर्शक अमोल लोहार यांनी ग्रामीण भागांमध्ये राहून हॉलीवूडच्या धाटणीचा मालपाणी हा 2014 ला चित्रपट तयार केला होता त्याच बरोबर दुष्काळ्या, बष्ट्या असे समाज प्रबोधन पर चित्रपट, लघुचित्रपट तयार केले. नुकतेच संकलन केलेल्या ‘ बूचाड या प्रा विशाल गरड दिग्दर्शित लघुपटाला तेलंगणाचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
त्याचप्रमाणे मयूर कावळे यांनी महाविद्यालयीन जीवनात पासून एकांकिका, मूकनाट्य, पथनाट्य, लघुनाट्य अशा प्रकारचे अभिनय व लिखाण केले आहे. मी नाही त्यातला या वेब सिरीजचे शूटिंग कारी या गावात झालेले आहे. ही वेब सिरीजग्रामीण भागातील तुमच्या आमच्यात घडलेल्या प्रसंगावर अवलंबून आहे. यामध्ये गावाकडच्या गोष्टी, गावाकडचे भांडण, गावातील राजकारण, गावाकडची प्रेम या घटकावर आधारित आहे. या वेब सिरीजचे लेखन दिग्दर्शक अमोल विष्णू लोहार, पटकथा मयुर कावळे, सह दिग्दर्शक लकी पाटील, ऋतुराज होवाळ, लाईट साऊंड गणेश रामपुरी, वेशभूषा मयूर काळे, रंगभूषा महेश कोरे, संगीत रब्बाना लोहार, प्रॉडक्शन मॅनेजर परीक्षित हाजगुडे, मारुती लोहार, ओमराजे घावटे आदींनी परिश्रम घेतले. वेब सिरीज मधील कलाकार मयूर कावळे, दिव्या स्वामी, श्रद्धा शिंदे, अमोल सुतार, राजेश पवार, लकी पाटील, महेश कोरे, वैष्णवी पटने, निखील घोळकर, संतोष साळुंखे, प्रवीण सुतार, मयूर काळे, गणेश रामपुरी, अवि शिंदे, प्रभाकर जगदाळे, आरती गोरे, अविष्कार सारंग रवी पकाले आदींनी भूमिका साकारली आहे.
या वेब सिरीजसाठी गावचे उपसरपंच खासेराव विधाते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल डोके, डॉ देवेंद्र डोके, राजेश पवार, महेश करळे, वैभव डोके, संतोष कावळे, मामा डोके, मोहन माने, सूर्यकांत निंबाळकर यांनी सहकार्य केले. या वेब सिरीज चा पहिला एपिसोड 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. ही वेब सिरीज पाहण्यासाठी GCP Marthi या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा अशी विनंती दिग्दर्शक अमोल लोहार यांनी केली.
पुढील सर्वप्रकल्प हे ग्रामीण भागातील विषयाला हात घातलेले असणार व हेच मुद्दे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा मानस. अमोल लोहार, दिग्दर्शक.
ग्रामीण भागातील कलाकारांना वेब सिरीज मुळे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे . कलाकारांत नेपुण्य असतेच फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे. अनिल चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष.
Thank You Team Kutuhal