कुतूहल न्यूज नेटवर्क
PM CARES फंडातून मोदी सरकार उभारणार देशभरात ऑक्सिजन प्लांट
नवी दिल्ली- देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. यातच अनेक रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.या परिस्थितीचे गांभीर्य पाहतापंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. PM CARES फंडामधून मेडिकल ऑक्सिजन प्लांट लावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
रुग्णालयांतील प्राणवायूची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पी.एम.केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधे 551 समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती सयंत्रांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला सैद्धांतिक मान्यता देण्यात आली आहे. ही सयंत्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
Oxygen plants in every district to ensure adequate oxygen availability…
An important decision that will boost oxygen availability to hospitals and help people across the nation. https://t.co/GnbtjyZzWT
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021
म्हणाले, की ही सयंत्रे जिल्हा पातळीवर प्राणवायु उपलब्ध करण्यास मोठी चालना देतील.ही समर्पित सयंत्रे,विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालयातील विशिष्ट सरकारी रुग्णालयांत स्थापित केली जातील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत यांची खरेदी करण्यात येणार आहे.
पी.एम.केअर्स निधीतून या वर्षाच्या प्रारंभी देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये अतिरिक्त 162 समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यासाठी 201.58 कोटी रूपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात ( पीएसए) प्राणवायु निर्मिती संयंत्र स्थापित करण्यामागील मूळ उद्दीष्ट सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अधिक सबलीकरण करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात स्वत:ची प्राणवायु निर्मिती सुविधा असणे, याबद्दल सुनिश्चित करणे हे आहे.
अशाप्रकारचे स्वत:चे प्राणवायु निर्मिती संयंत्र जिल्ह्यातील मुख्यालयातील रुग्णालयाच्या तसेच जिल्ह्याच्या दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूच्या गरजा पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, द्रवरुप वैद्यकीय प्राणवायु (एलएमओ) हा प्राणवायुची अतिरीक्त आवश्यकता पूर्ण करणारी यंत्रणा (टॉपअप) म्हणून काम करेल. जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांतील प्राणवायु पुरवठा आकस्मिकपणे खंडित होऊ नये आणि कोविड-19 रूग्ण किंवा इतर रुग्णांना अशा प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात नियमितपणे प्राणवायु पुरवठा करणे यामुळे सुनिश्चित होणार आहे.