कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी प्रतिनिधी : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना अद्यापही नागरिक बेफिकीरपणाने वागत आहेत. रस्त्यावर मास्क विना नागरिक फिरताना दिसून येत आहेत. आज कारी ता उस्मानाबाद येथे सकाळी 9 वाजता बस स्थानक परिसरात नागरिकांनी टाटा ऐस मध्ये आलेल्या मिरची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कारीत मिरची खरेदीसाठी उसळली गर्दी; सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा

नागरिकांना याबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. या बेफिकीर लोकांमुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत आहे. याला कुठेतरी लगाम बसण्याची गरज सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.