कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी):उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे गावामध्ये कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक, मदतनीस यांच्यामार्फत कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन त्यांची विचारपूस, प्राथमिक चौकशी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका करीत आहेत. या जनजागृती मोहिमेअंतर्गत लोकांना माहिती देऊन घ्यावयाची काळजी, बाहेर गावातून आलेल्या लोकांनी तपासणी करून घेऊन विलगीकरण कक्षात राहावे, संपर्कात आलेल्या लोकांनी वेळीच तपासणी करून घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, मास्क चा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी अशा सूचना घरोघरी जाऊन दिल्या जात आहेत.कोरोना रोगापासून बचाव व्हावा व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गोळ्यांचे वाटप ही करण्यात येत आहे.
कोरोनामुक्त गावासाठी आशावर्कर्स, शिक्षक, अंगणवाडी सेविका दारोदारी
गावच्या सरपंच नीलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के, पोलीस पाटील अमृता माळी, आरोग्य सेविका ए.बी. उमरदंड, आरोग्य सेवक बी .आर. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक हे सर्वजण कार्य करत आहेत.